‘एक शरद, सगळे गारद’; संजय राऊतांकडून ‘त्या’ मुलाखतीचा टिझर रिलीज

0

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात नेहमीच जवळीक राहिली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यात दोघांची भूमिका महत्त्वाची आहे. दरम्यान आता संजय राऊत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत अद्याप प्रसारित व्हायची आहे. या मुलाखतीची अनेकांना उत्सुकता आहे. त्यापूर्वी आज खासदार संजय राऊत यांनी ‘एक शरद, सगळे गारद’ या मथळ्याखाली ट्विटर अकाऊंटवरून त्या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला आहे.

ही मुलाखत तीन भागांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. तसंच या मुलाखतीचा पहिला भाग ११ जुलै रोजी शिवसेनेच्या मुखपत्रातून आणि डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला जाणार आहे. तसेच त्यानंतर १२ आणि १३ जुलै रोजी या मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भागही पाहायला मिळणार आहे. ही मुलाखत ऐतिहासिक ठरणार असल्याचा दावा संजय राऊत करतात. भूतकाळातील राजकीय घटना घडामोडी, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंतच्या मुद्द्यांना या मुलाखतीत स्पर्श करण्यात आलेला आहे.

Copy