‘एक वही एक पेन’ चे वितरण 

0

जळगाव : 3 जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त आणि 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच ‘एक वही एक पेन संकलन समिती,जळगाव यांच्या तर्फे कानळदा, खेडी खु, येथे व शहरातील जुने जळगाव परिसर डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, बोधिसत्व बुद्धविहार आणि गेंदालाल मिल, तक्षशिला बुद्धविहार या भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वही आणि पेनचे वितरण करण्यात आले.

दि.6 डिसेंबर रोजी डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी ‘एक वही एक पेन’ उपक्रमाच्या अंतर्गत संकलन करण्यात आले होते. या वही आणि पेनचे वितरण 1जानेवारी भीमा कोरेगांव शौर्य दिन आणि 3 जानेवारी सावित्रीमाई फुले जयंती निमीत्त करण्यात आले. यावेळी समितीचे प्रमोद इंगळे, सरपंच कैलास चौधरी, विलास सोनवणे, ग्रा.पं. सदस्य भिका सोनवणे, नारायण सोनवणे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, जि.प.प्राथमिक विद्यामंदिर खेडी खु, संत चोखा मेळा वसतिगृह,तक्षशिला बुद्धविहार गेंदालाल मिल,बोधिसत्व बुद्धविहार आंबेडकर नगर आदिंनी सहकार्य केले.