Private Advt

एक लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ : पतीसह चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : घरात सामान घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह चार जणांवर जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

उस्मानाबादच्या आरोपींविरोधात गुन्हा
शहरातील बळीराम पेठेतील माहेर असलेल्या सोनाली कन्हैय्या दहिहंडे (25) यांचा विवाह उस्मानाबाद येथील कन्हैय्या भिमाशंकर दहीहंडे यांच्याशी सन 2020 मध्ये रीतीरीवाजानुसार झाला आहे. लग्न झाल्यापासून पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेला माहेरहून दोन तोळ्याची सोन्याची पोत मागणी केली. ती मागणी पुर्ण न झाल्याने पती कन्हैय्या याने विवाहितेला शिविगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर नणंद हिने विवाहितेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर घरात वस्तू घेण्यासाठी माहेरहून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावला, पैसे न दिल्याने पतीसह सासू, सासरे व नणंद यांनी गांजपाठ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिते जळगाव येथील माहेरी निघून आल्या. मंगळवारी 21 डिसेंबर रेाजी विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती कन्हैय्या भिमाशंकर दहिहंडे, सासू अशा भीमाशंकर दहिहंडे, सासरे भीमाशंकर देविदास दहिहंडे (सर्व रा.उस्मानाबाद) आणि नणंद नम्रता राहुल जारखंडे (रा.जालना) या चौघांविरोधात रात्री शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास महिला पोलिस कॉन्स्टेबल अलका वानखेडे करीत आहे.