‘एक धाव कॅन्सर मुक्तीसाठी’ मॅरेथान उत्साहात

0

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 76 व्या वाढदिवसा निमित्त तसेच त्यांच्या संसदीय कार्यकीर्दीला 50 वर्ष पुर्ण झाल्या बद्दल धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे ’एक धाव कॅन्सर मुक्तीसाठी’ मॅरेथान स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. मनोहर सिनेमा गृहा जवळील छञपती शिवाजी महाराज पुतळयाला माल्यार्पणानंतर शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर महिला, पुरुष या दोन्ही गटातील मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. मॅरेथॉन स्पर्धेच्या समारोपानंतर विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. बक्षिस वितरणाचा कार्यक्रम गरुड मैदानावर आयोजित करण्यात आले होते.

सामाजिक बांधिलकी म्हणून स्पर्धेचे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे प्रास्ताविक करतांना खासदार शरद पवार यांच्या खेळांसबंधी असलेले प्रेम, तसेच त्यांनी आयुष्यात आलेल्या कॅन्सर सारख्या भयानक रोगावर बलाढ्य ईच्छाशक्तीच्या जोरावर मात केली. स्पर्धेच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा मिळावी या साठी मॅरेथान स्पर्धेला ’एकधाव कॅन्सर मुक्ती साठी’ नाव देण्यात आले तसेच मा.शरद पवार यांचे कार्य इतके मोठे आहे की या बाबत पंतप्रधान मोदीनी देखील त्यांची स्तुती केली आहे. अध्यक्षीय भाषणात आमदार राजवर्धनजी कदमंबाडे यांनी शरद पवारांन राजकारणा व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जपली म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.तसेच आगामी काळात कबड्डी व क्रीकेट स्पर्धांचा आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खेळाडू चा सम्मान
यावेळी क्रीडा शेञात उलेखनीय कामगिरी बजावणारे खेळाडु उत्कर्ष रवंदळे, हर्षाली बाबुराव सैदाणे, अजय सुर्यवंशी, करीष्मा सोनावणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर मॅरेथान विजयी पुरुष गट, प्रथम क्रमांक दिनकर संतु लिलक े(नाशिक), द्वितीय क्रमांक कांतीलाल कुंभार(नाशिक),तृतीय क्रमांक हिरामण यवील (नाशिक),महिला गटातुन प्रथम क्रमांक रंजीत पाडवी(धुळे पोलिस मुख्यालय),द्वितीय क्रमांक प्रियंका ठाकरे (धुळे),तृतीय क्रमांक कल्याणी आव्हाळे(धुळे) या खेळाडुंना बक्षिस, प्रमाणपत्र, ट्राँफी देवुन सत्कार करण्यात आला.

यांचे लाभले सहकार्य
यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री संदिप बेडसे,महापौर कल्पना महाले,मा.महापौर श्री मोहन नवले,मा.महापौर जयश्री आहीरराव ,युवक जिल्हाध्यक्ष सत्यजित सिसोदे,सभागृह नेते कमलेश देवरे,नगरसेविका मायादेवी परदेशी,महादेव परदेशी,नगरसेवक संदिप पाटोळे,नगरसेवक शरद वराडे,नगरसेवक दिपक शेलार मा.नगरसेवक संजय वाल्हे,नवाब बेग मिर्झा,साहेबराव देसाई,अरुण पवार,दिनेश पोतदार,नगरसेवक चंद्रकांत सोनार,सचिन आखाडे,भरत सोनवणे,युवती अध्यक्षा मिनल पाटील, सोनल आहीरराव,तसेच अँथलेटीक्स असोचे नरेन्द्र पाटील ,गणेश थोरात,योगेश वाघ,हेमंत भदाणे सर आदींचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सुञसंचालन रजनिश निंबाळकर सर यांनी केले