एक कोटी रुपयांच्या सोन्यावर मॅनेजरनेच मारला डल्ला : जंक्शनमध्ये खळबळ

भुसावळ : शहरातील पांडुरंग टॉकीज भागातील मणपुरम गोल्ड बँकेतील सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून युपीतील मॅनेजरने पळ काढल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बँकेचे ऑडीट सुरू असतानाच हा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिस उपअधीक्षकांची भेट
शहरातील पांडुरंग टॉकीज भागात मणपुरम गोल्ड बँक असून सोने तारण ठेवून बँकेतर्फे ग्राहकांना लोण देण्यात येते. या बँकेचे सुमारे दोन हजार शंभर ग्राहक असून त्यातील काही ग्राहकांनी सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. या बँकेत दोन महिन्यांपूर्वीच युपीतील एकाला मॅनेजर पदावर नोकरीची संधी देण्यात आली होती मात्र संबंधिताने बँकेतील लॉकरमधून सुमारे दोन किलोहून अधिक सोने चोरून नेल्याचा संशय बँक प्रशासनाने व्यक्त करीत पोलिसांकडे त्याबाबत तक्रार केली आहे. बाजारमूल्यानुसार या सोन्याचे किंमत एक कोटी रुपयांहून अधिक आहे.