Private Advt

एक कोटींचे ब्राऊन शुगर प्रकरण : मुख्य आरोपीसह महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

भुसावळ : एक कोटींच्या ब्राऊन शुगर प्रकरणी अटकेतील अख्तरी बानो अब्दुल रऊफ (45, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्‍हाणपूर) व पुरवठादार सलीम खान शेर बहादुर खान (किटीयानी कॉलनी, मनसौर, मध्यप्रदेश) यांना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली होती. आरोपींना सुरूवातीला 24 ते 29 दरम्यान तीन वेळा पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बुधवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर भुसावळ सत्र न्यायालयात न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता संशयीतांना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावेळी सरकारी वकीलांनी पोलिस कोठडी मागणी केली मात्र ती फेटाळण्यात आली. आरोपी अख्तरी बानोतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण पाल तर आरोपी सलीमतर्फे अ‍ॅड.लतीब एच.पिंजारी तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी युक्तीवाद केला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.