एका लाखासाठी विवाहितेचा छळ

0

जळगाव – बोदवड येथे सासर असलेल्या आणि जळगाव येथील माहेर असलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा घर बांधण्यासाठी 1 लाख रूपयांची मागणी करत छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात पतीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मेहरूण शिवारात राहणाऱ्या 24 वर्षीय विवाहितेचे बोदवडात राहणारे भरत उर्फ रविंद्र सुरेश माळी यांच्याशी 08 मे 2015 रोजी मोठ्या थाटात लग्न करून दिले होते. त्यानंतर काही दिवस दोघांचा संसार चांगला सुरू होता. अलिकडील काही महिन्यांपासून पती भरत सुरेश माळी, सासू नंदा सुरेश माळी आणि दिर निलेश सुरेश माळी यांना घर बांधण्याचे असल्याने त्यांनी विवाहितेस माहेरहून एक लाख रूपये घेवून ये असे सांगून मानसिक त्रास देणे सुरू केले. त्यानंतर माहेरीस पाठवून दिले. विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात पती भरत सुरेश माळी, सासू नंदा सुरेश माळी आणि दिर निलेश सुरेश माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy