Private Advt

एका लाखांसाठी विवाहितेचा छळ : वरणगावातील पतीसह चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : रीक्षा घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये न आणणार्‍या विवाहितेला मारहाण करण्यात आली तसेच उपाशी ठेवून छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह चौघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रास असह्य झाल्याने विवाहिता परतल्या माहेरी
जळगाव शहरातील जगवानी नगरातील माहेर असलेल्या प्रणाली राहुल खरात (20) यांचा राहुल कृष्णा खरात (रा.वरणगाव, ता.भुसावळ) यांच्याशी 2019 मध्ये प्रेमविवाह झाला आहे. लग्नाच्या सुरूवातीच्या तीन महिन्यानंतर पती राहूल खरात हा काहीही कामधंदा न करात दारूचे व्यसन जडले. त्यामुळे विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू व दोन नणंद यांनी विवाहितेविषयी पती राहूल खरात याच्या मनात कटूता निर्माण केली. दरम्यान, माहेरहून रिक्षा घेण्यासाठी 1 लाख रूपये आणावे यासाठी पती राहूल खरात याने तगादा लावला व पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्याचप्रमाणे पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला उपाशी ठेवत शारिरीक छळ केला. त्यानंतर विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला माहेरी सोडून दिले. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
गुरूवार, 24 मार्च रोजी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर पती राहुल खरात, सासू मंगला कृष्णा खरात, नणंद वर्षा उल्हास तायडे, रेशमा कृष्णा खरात (सर्व रा.वरणगाव, ता.भुसावळ) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.