Private Advt

एका मुलाच्या प्रेमात पडल्या २ मुली आणि …..

छत्तीसगड – अंबिकरपूरमध्ये रस्त्यावर दोन अल्पवयीन मुलींच्या गटांत जोरदार हाणामारी झाली. यामुळे तेथे प्रचंड गर्दी झाली होती. सुरुवातीला लोक दूरवर उभे राहून भांडण पाहत होते. मात्र, प्रकरण वाढल्यानंतर स्थानिकांनी दोन्ही गटांना शांत केले. बारम रोडवर मधोमध झालेल्या या भांडणामुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

मुलींच्या या दोन गटातील हाणामारीचे प्रकरण हे पूर्णपणे हाणामारीचे आहे. लोकांनी सांगितले, की येथील बरम पारा येथे राहणारी मुलगी एका मुलावर प्रेम करते. त्याच मुलावर शक्ती पारा येथे राहणाऱ्या मुलीचेही प्रेम आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर दोन्ही मुली नाराज झाल्या आणि आपापल्या गटातील मुलींना बोलावून त्यांनी रस्त्यातच हाणामारी केली. मुलींच्या हातात लोखंडी चेनही होती. अनेक मुलींनी हातात चेन घेऊन एकमेकांना पळवले. यासंदर्भात अद्याप पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचे निवेदन समोर आलेले नाही.

मुलीच्या प्रेमप्रकरणावरून मुला-मुलांमध्ये हाणामारीच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशा घटना नेहमीच समोर येत असतात. पण छत्तीसगडच्या अंबिकापूरमधून एक अशी घटना समोर आली आहे, जीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. येथे, एका मुलाच्या प्रेमप्रकरणातून दोन मुलींचे गट एकमेकांना भिडले. या वेळी दोन्ही गटांत प्रचंड शिवीगाळ झाली आणि प्रकरण अक्षरशः हाणामारीपर्यंत गेले. यावेळी दोन्ही गटांत भररस्त्यात लाथा-बुक्यांनी तुंबळ हाणामारी झाली. एवढेच नाही, तर या मुलींनी हातात चेन घेऊनही एकमेकींना पळवले देखील.