एका महिलेला आणि पुरुषाला व्हाट्सअॅपवर चॅटींग करणे पडले महागात

0

हैदराबाद : एका महिलेला आणि पुरुषाला महाग पडले व्हाट्सअॅपवर चॅटींग करणे आणि त्यांनी त्यांचे आयुष्यही संपवले. सिकंदराबादमधील मेरडपल्ली येथे ही घटना घडली. शिवकुमार हा त्याची मैत्रीण वेनेला हिच्याशी व्हाट्सअॅपवर नेहमी चॅटींग करायचा. ही गोष्ट त्याच्या पत्नीला खटकत होती.

शिवकुमारची पत्नी चॅटींग करण्याबाबत नाराज होती. शनिवारी तिने शेजारच्यांकडे शिवकुमारला घेऊन जाऊन समजवण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट त्याला खटकली होती. त्यानंतर शनिवारी शिवकुमार घरी एकटाच असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शिवकुमारच्या मृत्यूची बातमी समजताच वेनेला हिनेही अॅसीड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Copy