एकात्मिक आदिवासी विकास विभागाकडून प्रक्रियेला सुरुवात

0

यावल । यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून यंदादेखील सुमारे हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या विविध नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रवेश प्रकिया सुरु करण्यात आली आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जातो. 2017 – 18 साठी एक हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागाने हाती घेतली आहे. यासाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. मात्र, यासाठी पालकांना पाल्याचा जन्म दाखला, आधार कार्डची साक्षांकित प्रत सादर करावी लागेल. 10 जानेवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत प्रवेश अर्जांचे वाटप होईल. यानंतर हे अर्ज 25 फेब्रुवारीपर्यंत यावल कार्यालयात द्यावे लागतील. या योजनेचा अनुसूचित जमातीच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर.बी. हिवाळे यांनी केले आहे.

विद्यार्थीअनुसूचित जमातीचा असावा, विद्यार्थी किंवा पालकांचे नावे सक्षम अधिकार्‍याने दिलेल्या जातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत करावी. बीपीएल यादीतील असल्यास अनुक्रमांक नमूद असलेला ग्रामसेवकाचा दाखला, वार्षिक एक लाख मर्यादेतील उत्पन्नाचा दाखला, पहिलीसाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्याचे वय वर्षे पूर्ण असावे.