एकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग

0

मुंबई: देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस संसर्ग वाढतच असल्याने चिंता वाढली आहे. सामान्य व्यक्तींपासून राजकीय नेते मंडळी देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील बडे नेते शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. ट्वीटकरून त्यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘“काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती’.