एकच पर्व, बहुजन सर्व, बहुजनांचा नारा!

0

जळगाव । एकच पर्व, बहुजन सर्व…! या नार्‍याअंतर्गत जिल्ह्यातील लाखो बहुजनांनी बुधवारी बहुजन क्रांती मार्चां बुधवारी 11 जानेवारीला या मोर्चांमध्ये जिल्ह्याभरातून बहुजन बांधव शहरात सकाळपासूनच दाखल झाले होते. ते सर्व गटागटाने शिवतिर्थ मैदानावर सकाळी 10 वाजेपासूनच जमले होते. शिवतिर्थ मैंदानावर भिमगीते सादर करण्यात आली. या भिमगीतांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. याबहुजन मोर्चांसाठी विविध 50 ते 75 संघटनांचे कार्यकर्ते तसेच नागरिक शिवतिर्थ मैंदानावर जिल्ह्याभरातून दाखल झाले होते. मैंदानवरील भिमगीतांनी मोर्चांत सहभागी होणार्‍यांमध्ये नवचेतना निर्माण केली.

अशा आहेत बहुजनांच्या मागण्या
अनुसूचीत जाती, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी, मुस्लीम अल्पसंख्याक आदी समुहांना संघटीत करुन बहुजन समाजाच्या घटनात्मक हक्क व अधिकाराची शासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात करावी, बहुजन समाजाच्या जीवन मरणाच्या समस्यांचे समाधान व्हावे, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टची कडक अंमलबजावणी करुन जलद न्यायालयाची स्थापना करावी, भटके विमुक्ताचा या अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टमध्ये समावेश करावा, मूस्लीम, मराठा, धनगर आदींना आरक्षण द्या, ओबीसी समुहाची जातीनिहाय जनगणना करुन त्यांच्यासाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतुद करण्यात यावी, कोपर्डी प्रकरणातील संशयितांना फाशी शिक्षा व्हावी, शिक्षण क्षेत्राचे सरसकट राष्ट्रीयकरण करण्यात यावे आदी मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्याभरातील बहुजन समाजातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह सहभागी झाले होते.

सामाजिक संस्थातर्फे पाणी वाटप, सरबत वाटप
मोर्चांच्या मार्गांवर विविध सामाजिक संघटनांतर्फे मोर्चांत सहभागींसाठी पाणी वाटप, सरबत वाटप व नाश्तांची सोय करण्यात आली होती. यात शिवतिर्थ मैंदानावर गेंदालाल मिल येथील भिमा कोरेगाव चौकांतील सुनील त्र्यंबक चौधरी व फिरोजा इलियाज पठाण यांनी शरबत वाटप करण्यात आले. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक वही एक पेन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी गार्डन जवळ नाशिबाद येथील बौध्द समाज बहुउद्देशीय पंच मंडळातर्फे तसेच युवाशक्ती फाउंडेशनतर्फे मोर्चाकर्‍यांना पाण्याचे पाऊच वाटप करण्यात येत होते. अण्णासाहेब विश्‍वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे मोफत प्रथमोपचार केंद्र स्वातंत्र्य चौकात लावण्यात आले होते.

शिवतीर्थ मैदानापासून मोर्चास झाली सुरुवात
शिवतीर्थ मैदानापासुन मोर्चाची सुरवात दुपारी 1 वाजता करण्यात आली. मोर्चांतील सहभागींनी हातामध्ये भगवा,निळा, हिरवा, पिवळा, पंचशील अशाप प्रकारचे झेंडे हातात घेतले होते. कोर्ट चौक, ला.ना. विद्यालय चौक, नविन बस स्थानक, स्वातंत्र चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते आकाशवाणी चौक पर्यंत मोर्चा काढण्यात आला.

बहुजन क्रांती मोर्चोत असा होता पोलिस बंदोबस्त
कोर्ट चौक ते आकाशावाणी चौक हा मार्ग पोलिसांद्वारे बंद करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा बंदोबस्तासाठी अपर पोलीस अधीक्षक 1, पोलीस उपअधिक्षक 3, पोलीस निरीक्षक 10, सपोनि 35, पुरूष पोलीस कर्मचारी 550, महिला पोलीस कर्मचारी 60 ट्रॉफीक पोलीस 100 तर 4 आसीपी प्लॅटून तर 1 क्युआरटी प्लॅटून तैनात करण्यात आली होती. कोर्ट चौक ते आकाशावाणी चौकात तीन ठिकाणी मुख्य मंडप टाकण्यात आलेले होते.

मुस्लीम बिरादरीसह अल्पसंख्याकांचा समावेश
यामोर्चांत मुस्लीम समाज बिरादरी, अल्पसंख्याक सेवा संघचे जहाँगिर खान, तसेच विविध मुस्लिम संघटना, आदिवासी वाल्मिक लव्य सेनाचे मोहन शंकपाळ, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे भानुदास विसावे, जनसंग्राम संघटनेचे विवेक ठाकरे, मेहतर समाजाचे शिवचरण ढंढोरे, बारा बुलेदार महासंघचे चंद्रकांत सोनवणे, मराठा समाजाचे राम पवार, सावरकर रिक्षा युनियन ,खान्देश मातंग विकास मंडळाचे सुरेश अंभोरे, जळगाव जिल्हा मुस्लिम खाटीक समाज, भारतीय कामगार संघटना, समता परिषद ,जनसंग्राम संघटना, काकर बिरादरी,अल्पसंख्याक विकास परिषद, उजमा बहुउद्देशिय संस्था, डेबुजी फोर्स, ब्लॅक कॅट फाऊंडेशन, ओबीसी विद्यार्थी परिषद आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

यामोर्चांत जिल्हाभरातून मुस्लीमबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होेते. मोच्यादरम्यान बहुजन एकतेचा नारा देण्यात येत होता. मोर्चकर्‍यांच्या हातातील विविध रंगाची झेंड्यांनी संगळ्याचे लक्ष वेधले होते. यामध्ये भगव्यासोबत हिरवा झेंडा नाचतांना दिसत असल्याने यामध्ये राष्ट्रीय एकात्मता व बहुजन एकत्र आल्याचे निदर्शनास येत होते. बहुजन एकतेचा नारा यावेळी देण्यात येत होता.

साफसफाईंसाठी यांनी बजावली सेवा
मोर्चोत साफसफाईचे काम भालेराव प्रतिष्ठान, जिया फाउंडेशन महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच एल.के. फौउंडेशनद्वारे करण्यात आले. मोर्चापुढे सरकत असतांना रिकामे पाणी पाऊच रस्त्यावर पडलेले असतांना या प्रतिष्ठानांनी तात्काळ सेवा देत रस्त्यांची साफसफाई केली. बहुजन क्रांती मोर्चोमध्ये सामाजिक ऐक्य दिसून आले. यासोबत मोर्चोत गरबड गोंधळ उडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

विविध संघटनांतर्फे मुलींनी दिले निवेदन
या मोर्चाचे निवेदन मुलींसह विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल याना देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर मुलींनी उपस्थित बहुजन समाजाला प्रबोधनपर संबोधन केले. या संबोधनात मुलींनी आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्यांनी उपस्थित केला. आरक्षण नसल्यामुळे नौकरीच्या शक्यता कशा कमी होतात. त्याचबरोबर शिक्षणातही त्या कशा मागे पडतात? यावर त्यांनी संबोधन केले. आरक्षणाची आवश्यका का आहे? हा मुद्या मुलींना प्रकर्षाने सांगितला.

जिल्हाभरातील विविध संघटनांचा मिळाला प्रतिसाद !
या मोर्चामध्ये जमाते इस्लामी हिंद, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी बिग्रेड, बंजारा टायर्गस, वीर एकलव्य आदिवासी संघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, वाल्मीकलव्य संघटना, अखिल भारतीय बौध्द महासभा, राष्ट्रीय किसान मोर्चा, जोशी गोंधळी समाज संघटना, अहिर सुवर्णकार संघटना, बारा बलुतेदार संघटना, नाभिक समाज मंडळ, ठाकुर आदिवासी समाज मंडळ, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, मुस्लिम पिंजारी समाज बिरादरी डेब्युजी फोर्स, जनसंंग्राम संघटना, विर सावकरकर रिक्षा युनियन आदि संघटना सहभागी झाल्या होत्या. यामध्ये मुस्लिम समाज बिरादरीचे काकर बिरादरी, छप्परबंद शहा बिरादरी, पिंजारी बिरादरी पटेल, देशमुख, देशपांडे बिरादरी, खाटीक बिरादरी, बागवान बिरादरी, मनियार बिरादरी, कुरेशी बिरादरी, अल्पसंख्याक सेवा संघ, अलखैर वेल्फेअर सोसायटी, नियाज अली फौउंडेशन, मुस्लिम समन्वयक समिती, अलहिंद ट्रस्ट, राइन फाउंडेशन, अल्पसंख्याक विकास परिषद, उजमा बहुउद्देशीय संस्था, मुस्लिम मनियार बिरादरी, एकलव्य सेना, आदिवासी तडवी, संत गाडेबाबा युवा फाउंडेशन सत्य शोधक ओबीसी परिषद, मेहतर विद्यार्थी परिषद, हॉकर्स युनियन, जळगाव जिल्हा परिट धोबी शिक्षक, शिक्षकेत्तर संघटना, ब्लॅककॅट फाउंडेशन आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

विविध जातींच्या संघटनांचा मोर्चात सहभाग – विचारमंचावर बहुजन क्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, आरपीआय कवाडे गटाचे जगन सोनवणे, जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुफ्ती हरुन नदवी, शरद तायडे, आरपीआय गवई गट राजीव सूर्यवंशी, मेहतर समाज समुहाचे शिवचरण ढंडोरे, कुणबी मराठा समाज समुहाचे शिवाजीराव पाटील, वंजारी समुहाचे अशोक लाडवंजारी, भटक्या जमाती समुहाचे प्रशांत नाईक, आदिवासी समुहाचे रमजान तडवी, धनगर समाज समुहाचे सुभाष सोनवणे, माळी समाज समुहाचे वसंत महाजन, बंजारा समाज समुहाचे किरण पातोंडेकर, शिंपी समाजाचे मुकुंद मेटकर, कंजार भाट समाजचे दिनकर बागडे, वासुदेव जोशी समाजाचे पुष्पेंद्र जोशी, भोई समाज समुहाचे साहेबराव भोई, कैकाडी समाज समुहाचे हितेंद्र गायकवाड, कोष्टी समाज समुहाचे रमेश कोष्टी, नाभीक समाज समुहाचे मुरलीधर आंबोडकर, चर्मकार समाज समुहाचे भानुदास विसावे, कोळी समाज समुहाचे मोहन शंखपाल, पांचाळ समाज समुहाचे ओगल पांचाळ, बौध्द समाज समुहाचे दिलीप सपकाळे, लेवा पाटील समाज समुहाचे डॉ. मिलींद कोल्हे, ठाकूर समाज समुहाचे रणजित शिंदे, पिंजारी समाज समुहाचे अशपाक पिंजारी, मुस्लिम पटेल समाज समुहाचे फहीम पटेल आदी उपस्थित होते.

हक्कासाठी झगडावे लागते
जैननबी पटेल हिने वतने खुन मागा हमने बदन निचोंड दिया मगर इतिहास कारोने हमे चौराहपर छौड दिया.हम अपने वतनेसे प्यार करते है,आंबेडकर यांना विसरू शकत नाही ज्याठिकाणी विज्ञाला आकाशा पर्यंत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम तर दुसरे मुलीसाठी शिक्षणासाठी संघर्ष केला त्या सावित्रीबाई फुले यांना आपण विसरू शकत नाही. मात्र देशातील काही ठेकेदार देशाला आपली संपत्ती समजतात. मात्र ते विसरतात की या देशाच्या माटीत आपले सर्वांचे रक्त मिसळलेले आहे. काश्मिरच्या हिदुस्थान्यांना हक्क द्या, नजिमच्या आईला हक्क द्या, गेल्या 60 वर्षापासून आपला हक्क हिसकविण्यात आला आहे.डॉ.सरज आणि डॉ.आंबेडकर हे सर्वधर्म जातीच्या लोकांना हक्क देण्यास इच्छुक होते.तर सबका साथ सबका विकास हे खोटे आहे. आपल्या हक्कासाठी आपल्याला झगडावे लागत आहे. असे जैननबी पटेल हिने आपल्यां भाषणातून आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अन्याय करणारा कुणीही असला तरी त्यास कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. रुपाली सूर्यवंशी, निर्मिती सोनवणे, भाग्यश्री ठाकरे आदींनी आपले विचार व्यक्त केले.