ऊस तोडणी कर्मचार्‍यांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप

0

नवापूर – आदिवासी सहकारी साखर कारखाना लि.सुरुपसिंग नाईक नगर डोकारे कारखान्याचा गाळप हंगाम 2018/19 चालू असताना नवापूर गट कार्यक्षेत्रातील गाव, रायंगण या गावात ऊस तोडणी कंत्राटदार संपत टेंबर्‍या वसावे रा.मोकस या कंत्राटदाराचे मजूर ऊसतोडीला शेतात निघून गेल्यावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक तीन मजूरांच्या झोपड्यांना आग लागून मजुरांचे धान्य, कपडे, व संसार उपयोगी पूर्ण साहित्य जळून खाक झाले. हि माहिती मिळताच कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी ताबडतोब प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून पंचनामा केला.

कारखान्याला पाठवल्यामुळे कारखान्याने ऊस तोडणी मजूरांना धान्य, कपडे-लत्ते व संसार उपयोगी साहित्य घेण्या साठी आर्थिक मदत केली. आदीवासी सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोडणी मजूराचे झोपड्यांना आग लागून मजूराचे संसार उपयोगी साहित्य नुकसानाची भरपाई कारखान्यातर्फे कारखान्याचे कर्मचारी अजय गावित, ऊस पुरवठा अधिकारी, रमेश पाडवी, सहाय्यक ऊस पुरवठा अधिकारी व लेबर आँफिसर रोहिदास गावित यांनी दिली.