उष्माघाताने प्राणी-पक्षांना भिरभिरी

0

मुंबई (प्रतिभा घडशी) – मागेच कर्नाटकात तहानेने व्याकुळ झालेल्या कोबा्रला बाटलीने पाणी पाजले असे असताना आज नाशकात एक गाय उष्माघाताने बेशुद्ध पडल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात सुर्य तापला असताना उष्माघाताचा लोकांच्या आरोग्याबरोबरच प्राण्यांच्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणावर वाईट परिणाम होताना दिसून येत आहे. उष्माघाताने आत्तापर्यंत महाराष्ट्रात 5 जणांचा बळी गेला आहे. मात्र प्राण्यांच्या संख्येबाबत एक आकडा संगणे अशक्य आहे. त्यामुळे या उष्माघाताने प्राणी-पक्षांना भिरभिरी येऊ लागली आहे.

गंगाघाटावरील श्री एकमुखी दत्तमंदिरासमोर भर दुपारी 12 वाजेच्या सुमारास कडाक्याच्या उन्हामुळे गाय बेशुद्ध झाल्याची घटना मंगळवार (दि. 4) रोजी घडली. भर रस्त्यात गाय बेशुद्ध पडल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली. मात्र, गायीच्या मदतीला कुणीही पुढे येईना. सदर बाब काही जागरूक नागरिकांनी कृषी सेवा केंद्राला कळविली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या कार्यकर्त्यांनी गायीवर प्राथमिक उपचार केले. ऊन आणि गाभण असल्याने गाय बेशुद्ध झाल्याचा त्यांनी प्राथमिक अंदाज काढला.

प्राण्यांमध्ये उष्माघाताचा परिणाम
परिसरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यास प्राण्यांना उलट्या, जुलाब, चक्कर येणे, नाकातून रक्त येणे यांसारखा परिणाम होऊन प्राणी-पक्षांची तब्बेत खालावते. विशेष म्हणजे प्राणी-पक्षांमधील बॉडी टेम्परेचर वाढून त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो आणि परिणामी त्यांचा जीव जाऊ शकतो.

उपाय योजना
ज्याप्रमाणे माणसाच्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे प्राण्यांनाही उन्हाळ्याच पाण्याची प्रचंड गरज जाणवते. त्यामुळे यासाठी नागरिकांनी प्राणी-पक्षांसाठी आपल्या आजुबाजुच्या परिसरात पाण्याचे माठ आणि किंवा खाण्यासाठी काही पदार्थ ठेवावेत. जेणे करुन ते पदार्थ आणि पाणी प्राणी-पक्षांसाठी उपयोगी येईल.

बेशुद्ध प्राणी सापडल्यास घरघुती उपाय
परेल येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्यारांकडून पशु पक्षांवरील प्राथमिक उपचाराबाबत माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, आपल्या परिसरात एखादा उषमाघाताने बेशुद्ध पक्षी निदर्शनास आला तर त्याला त्वरील त्याच्यावर थंड पाण्यांचा शिडकाव करा, त्याच्या डोक्यावर बर्प ठेवा, किंवा ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवा, त्याला पाणी पाजा. पाण्याशिवाय उर्जा निर्माण करतील असे काही पेय देखील पाडले तरी हरकत नाही. या प्राथमिक उपचारानंतर त्यांना पशुडॉक्टरांकडे नेऊन त्यावर उपचार करा.

प्राण्यांमध्ये तापमान सहन करण्याची ताकद
कुत्रा, गाय-बैल, मांजर, शेळी, घोडा यांसारख्या प्राण्यांचे शारीरिक तापमान 98 डिग्री फॅरानाईट ते 102 डिग्री फॅरानाईट एवढे असणे गरजेचे असते मात्र त्यापेक्षा जास्त तापमानाचा त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तर पक्षांमध्ये 105 डिग्री फॅरानाईट ते 107 डिग्री फॅरानाईट येवढे शारीरिक तापमान असणे गरजेचे असते. त्यापेत्रा अधिक झाल्यास त्याचा पक्षांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तर माणसामध्ये 30 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस एवढे तापमान असावे. त्यापेक्षा अधिक झाल्यास उष्माघाताचा वाईट परिणाम माणसावर होऊ शकतो.

हल्ली शहरात बांधकाम वाढल्यामुळे प्राणी-पक्षांना निवारा राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना सावलीसाठी पर्यायी जागा शोधण्याासठी वणवण करावी लागेत. वृक्षांची होणारी तोड पाहता त्यांना निवारा मिळणेही शक्य होत नाही. परिणामी शरिराला पुरेसा थंडावा न मिळाल्याने त्यांच्या आरोग्यावर उन्हाचा बराच वाईट परिणाम दिसून येतो. या प्राणीपक्षांसाठी नागरिकांनीही सहामुभूती दाखवून त्यांच्या परिसरात पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली तर प्राणी पक्षांसाठी ते लाभदायक ठरेल.
डॉ. जी.एस खांडेकर,
सहयोगी प्राध्यापक, पशुशल्यचिकीत्साशास्त्रव क्ष-किरण विभाग,
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय