उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार

0

निगडी : भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र, क्रीडा मंत्रालय आणि येथील नंदकिशोर कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा गौरव करण्यात आला. निगडी येथील नंदकिशोर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक उत्तम केंदळे, सचिन चिखले, कथ्थक नर्तक डॉ. पंडित नंदकिशोर कपोते, नेहरू युवा केंद्राचे संचालक यशवंत मानखेडकर, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते आदी उपस्थित होते.

25 महिलांचा सत्कार
या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड, पुणे, तळेगाव, जुन्नर, नारायणगाव, बारामती अशा विविध ठिकाणांहून आलेल्या 25 महिलांचा मान्यवरांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दीप्ती मोरे, सरला अच्छा, मीना मानखेडकर, साधना कपोते, वर्षा कपोते, पत्रकारितेमध्ये लीना माने, आशा साळवी तर सलोनी जाधव (योगा), अनिता मग, सुनीता मांडवे, पूजा सराफ, उषा खोल्लम, निर्मला जाधव, सुमन शिर्के (सांप्रदायिक), स्मिता चौधरी (कला), रेखा परदेशी, वैशाली गाढवे, श्रीलशा पाळेकर, माजी नगरसेविका अश्विनी चिखले, शुभांगी कात्रेला, महानंदा माने (पोलिस निरीक्षक) आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत मानखेडकर यांनी केले. सरोज राव यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र कपोते यांनी आभार मानले.