BREAKING: उर्मिला मातोंडकरांचा शिवसेनेत प्रवेश

0

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिवसेनेकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले होते. दरम्यान उर्मिला मातोंडकर यांनी आज मंगळवारी १ डिसेंबर रोजी शिवसेनेत पक्षषप्रमुउद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केेला. रश्मी ठाकरे यांनी शिवबंधन बांधून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना प्रवेश दिला.

यापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यामुळे हा काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे.

उर्मिलाने २०१९ ची लोकसभा काँग्रेसकडून निवडणूकही लढवली होती. गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्या कॉंग्रेसमध्ये सक्रीय नव्हत्या.

कंगना रानौत प्रकरणात उर्मिलाने शिवसेनेची बाजू घेत कंगनाला फटकारले होते, त्यामुळेच शिवसेनेकडून उर्मिलाला उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.

 

Copy