‘उरी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

0

मुंबई : विकी कौशलने त्याच्या अभिनय कौशल्याने बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांवर भूरळ पाडली आहे. आता त्याचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१६च्या ‘उरी’ हल्ल्यावर आधारित ‘उरी’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

जम्मू काश्मीरच्या ‘उरी’ येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. याच हल्ल्यावर आधारित हा ‘उरी’ चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धार हे करणार आहेत.या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विकी कौशलचा जबरदस्त लूक दिसून येतो.

Copy