उमवीतील विद्यार्थ्याच्या मागणीला यश

0

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याकडून राज्य आणि राष्ट्रीय पात्रता (नेट-सेट) परिक्षेविषयी मार्गदर्शनासाठी कार्यशाळा घेण्यात यावी यासाठी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्याच्या यामागणीला यश आले असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मध्यवर्ती ग्रंथालयात 2 ते 5 जानेवारी दरम्यान नेट-सेट परिक्षेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उमवी परिसरातील मध्यवर्ती ग्रंथालयात 11 ते 5 या वेळेत कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेसाठी कमलाकर पायस(अमरावती),डॉ.दिगंबर खोब्रागडे (भुसावळ), डॉ. मंगला हिरवाडे (नागपूर), डॉ.भारत कराड(उमवी), यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्याहस्ते होणार आहे. उत्तर महारष्ट्र विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत असलेले आणि नेट-सेट परिक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्याकडून विद्यापीठातर्फे परिक्षेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. स्वप्निल पाटील, भुषण सोनजे, श्रीकृष्ण जैस्वाल, योगेश्‍वर पाटील, कृष्णा मुळे आदी विद्यार्थ्यांनी यासंबंधी मागणीचे निवेदन देखील कुलगुरुंना दिले होते.