उमवित डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला

0

जळगाव । डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, यासाठी जिथे संधी मिळाली तेथे वौचारिक विचार, भाषणे, संघर्ष केला हे आश्चर्य करुन देणारे आहे. यासाठी मिळणारी शक्ती ही त्यांना भगवान बुध्द यांच्या प्रेरणेतून मिळत गेली. शस्त्र व शास्त्र यांचा अधिकार सर्वांना नव्हता आणि हा अधिकार सर्वांना असला पाहिजे, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेप्रसंगी भिकू इदाते, अध्यक्ष, राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोग, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन उत्साहात पार पडले.

शस्त्राचा अधिकार सर्वांना हवा होता तसा ज्ञानाचा म्हणजे शास्त्राचा अधिकार सर्वांना हवा आहे. या विसंगतीमुळे देशामध्ये अनेक प्रकारच्या विकृती निर्माण झाल्या आहेत आणि त्यासाठी माणसांमध्ये सामाजिक परिवर्तन रुजविण्याचे बीजं बाबासाहेब आंबेडकरांनी पेरलीत. लोकमान्य टिळक, महात्मा फुले आणि वासुदेव बळवंत फडके या तिघांचे लहूजी साळवे गुरु होते. विचारधारा जरी वेगवेगळी होती तरी जाती-पातीला धारा नव्हता असे प्रतिपादन श्री.इदाते यांनी केले. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिलीप पाटील यांनी व्याख्यानमाला आयोजनामागची भूमिका विशद केली. प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.सत्यजित साळवे यांनी केले तर प्राचार्य एल.पी.देशमुख यांनी आभार मानले.