उमविच्या राष्ट्रीय परीषदेचा समारोप

0

जळगाव । माध्यमांमध्ये महिलांच्या प्रश्नांना ठळक स्थान दिले तर महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. तेवढे सामर्थ्य माध्यमांमध्ये निश्चितच आहे, असे मत माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागाच्या वतीने आयोजित ‘महिला आणि माध्यमे: काल, आज आणि उद्या’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.के.बी.पाटील बोलत होते. विशेष कार्य अधिकारी प्रा.पी.पी.माहुलीकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, विभागप्रमुख डॉ.तुकाराम दौड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख प्रा.संजय तांबट, परिषदेचे संयोजक डॉ.सुधीर भटकर उपस्थित होते. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.सुशील अत्रे होते. यामध्ये मिलिंद कुलकर्णी (लोकमत), विजय बुवा (सकाळ), त्र्यंबक कापडे (दिव्यमराठी), हेमंत अलोने (देशदूत), अनिल पाटील (एकमत) व शांताताई वाणी (देशदूत) यांनी भाग घेतला.

आमंत्रित मान्यवरांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन : समारोपाच्या आधी माध्यमातील बदलते आयाम व महिलांचे योगदान या विषयावर शहरातील संपादकांसमवेत चर्चा झाली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.सुशील अत्रे होते. यामध्ये मिलिंद कुलकर्णी (लोकमत), विजय बुवा (सकाळ), त्र्यंबक कापडे (दिव्यमराठी), हेमंत अलोने (देशदूत), अनिल पाटील (एकमत) व शांताताई वाणी (देशदूत) यांनी भाग घेवून माध्यमातील स्त्रीयांच्या सहभागाविषयी तसेच महिलांच्या प्रश्नांना माध्यमामध्ये मिळणाज्या स्थानाविषयी चर्चा केली. मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, बातमी कोण घेवून आले याला महत्व नाही तर बातमी मूल्य पाहून बातमी दिली जाते. विजय बुवा यांना बातमीचे मूल्य जन्मत:च ठरलेले असते. महिला पत्रकाराने लिहिलेली बातमी पुरुष संपादकाने संपादित केली तर थोडाफार फरक पडतो. पत्रकारितेत महिलांचे प्रमाण वाढले तर बातमी लेखनात फरक पडणार नाही. गुणवत्ता ही स्त्री अथवा पुरुष असो समान आहेत असे ते म्हणाले. महिला पत्रकार या धाडसाने राजकीय नेत्यांना प्रश्न विचारु शकतात असे मत व्यक्त करुन त्र्यंबक कापडे यांनी गुणवत्ता असूनही संपादक पदापर्यंत महिला जात नाहीत असे सांगितले. हेमंत अलोने यांनी महिला पत्रकारांची संख्या कमी असल्याची खंत व्यक्त करुन करिअर म्हणून महिलांनी पत्रकारितेत यावे. त्यामुळे विधायक पत्रकारिता वाढेल, असे मत व्यक्त केले. अनिल पाटील यांनी आवड त्याच बरोबर गरज, छंद आणि समाजासाठी काही करण्याची प्रेरणा यामुळे पत्रकारितेकडे महिलांचा ओढा वाढत असल्याचे सांगून पूर्वी चळवळीतून महिला माध्यमात आल्या होत्या असे सांगितले. शांताताई वाणी यांनी पत्रकारितेत महिला आणि पुरुष असा भेद कधी जाणवला नाही. सर्व प्रकारच्या बातम्यांचे वृत्तांकन महिला करु शकतात असे मत व्यक्त केले. या सत्राचे सुत्रसंचालन युवराज परदेशी यांनी केले. प्रविण चंदनकर यांनी आभार मानले.

डॉ. दौड यांनी घेतला आढावा
माध्यम हा विषय आता बहुविद्याशाखीय झाला आहे. अलिकडच्या काळात महिलांचा सहभाग माध्यमांमध्ये वाढला आहे. माध्यमातून त्यांना आपल्या अपेक्षा, प्रश्न मांडता येतात. पत्रकारितेत मोठी ताकद आहे. यापूर्वी देशाच्या विकासात 50 टक्के महिलांना वगळले गेल्यामुळे भारतावर आक्रमणे झाली. आता सर्वांचा समाज विकासात सहभाग घ्यावा लागतो ही समज वाढीला लागली आहे. स्त्रीयांच्या प्रश्नांवर माध्यमे अधिक प्रभावीपणे आपली भूमिका मांडॅ शकता आणि त्याकडे सामाजिक दायित्व म्हणून माध्यमांनी पाहावे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.