उपस्टेशन प्रबंधकांसह मालगाडी परीचालकाच्या सतर्कतेने टळला अपघात

0

डीआरएम आर.के.यादव यांनी केला सतर्क कर्मचार्‍यांचा भुसावळात गौरव

भुसावळ- वीज प्रकल्पासाठी पारस येथून कोळसा वाहून नेणार्‍या मालगाडीच्या एक्सलमधून ठिणग्या उडत असल्याची बाब येऊलखेड उपस्टेशन प्रबंधक एल.एस.निनावे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मालगाडीचे गार्ड अनिरूद्ध कुमार (बडनेरा) यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीने गाडी थांबवल्याने मालगाडीचा संभाव्य अपघात टळला तर चालक व गार्डने परीक्षण केल्यानंतर बॉक्स एन वॅगनचा एक्सल जळत असल्याने अकोला रेल्वे स्थानकावर धोकेदायक वॅगन बाजूला सारून मालगाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. दोन्ही कर्मचार्‍यांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी उभय कर्मचार्‍यांना रोकड व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला.

Copy