Private Advt

उपमहापौरांवरील गोळीबार प्रकरण; आरोपी पोलिसांना शरण

रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उपमहापौरांवरील गोळीबार प्रकरण; आरोपी पोलिसांना शरण
जळगाव । महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील चौथा संशयितआरोपी पोलिसांना शरण आला आहे. या अगोदर तीन संशयित आरोपींना अटक झालेली आहे.
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झालेला आहे. त्यांच्या फिर्यादीवरुनरामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या अगोदर या प्रकरणातील आरोपी किरण शरद राजपूत (वय 24 ), उमेश पांडुरंग राजपूत (वय 21) व महेंद्र राजपूत (पिंप्राळा) यांना अटक झालेली आहे. यातील चौथा संशयित आरोपी मंगलसिंग युवराज राजपूत (वय 32, रा. पिंप्राळा) हा रामानंदनगर पोलिसांना शरण आला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात संशयितांकडून पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत. दरम्यान, जुगल बागुल व भूषण बिर्‍हाडे पसार झाले आहे.