उपजिल्हा रूग्णालयात दंत, सर्व रोग निदान शिबीर

0

नवापुर । शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य दंत व सर्व रोग निदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन खासदार डॉ.हिना गावीत यांनी दिपज्वलन करुन केले. अध्यक्षस्थानी आमदार सुरुपसिंग नाईक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी जिल्हापरिषद अध्यक्षा कुमुदिनी गावीत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये.अतिरिक्त जिल्हा चिकीत्सक डॉ.अनिल गावीत, डॉ.राजेश वसावे, डॉ.शरद काळे, डॉ.नरेद्र पाडवी, डॉ.अजय कुवर, डॉ.हर्षाली गावीत, डॉ.महेश मसराम, डॉ.के.डी सातपुते, डॉ.रंजीत पावरा, डॉ.युवराज पराडके, जी. के. पठाण, तानाजी वळवी, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक चंद्रकांत नगराळे, नगरसेविका रिना पाटील.गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, अनिल वसावे, एजाज शेख, सुभाष गावीत, प्रदिप वळवी आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार डॉ.हिना गावीत यांनी आजाराची पुर्ण माहीती तुम्ही द्या आम्ही असे शिबिर सर्व तालुक्यात राबवित आहोत. आदिवासी महिला या फार लाजाळु असतात ते आपल्या आजारा बदल निट निराकरण करत नाही त्यामुळे आजार हा मोठ्या प्रमाणात वाढत असतो. डॉक्टराना आपल्या आजारा विषयी सर्व माहीती द्यावी काही आजार हे असे असतात की ते औषधाने बरे होतात.व्यसना पासुन दुर रहा असे आवाहन खासदार गावीत यांनी केले. प्रस्तावना डॉ.राजेश वसावे यांनी केली. या सुत्रसंचालन प्रियंका मालुसरे यांनी तर आभार डॉ.अविनाश मावची यांनी मानले यशस्वीतेसाठी डॉ.अविनाश मावची, डॉ.संजीव वळवी, डॉ.मनिषा वळवी, डॉ.प्रमोद कटारीया, डॉ.धिरे द्र चव्हाण, डॉ.कितीलता वसावे, डॉ.युवराज पराडके, डॉ.महेश मसराम यांनी कामकाज पाहिले.