उपचारानंतर ताहिरा कश्यप परतली कामावर!

0

मुंबई : आयुष्मान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप एक आजाराने लढत आहे. तिला स्तनाचा कॅन्सर झाला आहे. ताहिराने मास्टेक्टोमीचे उपचार घेतले असून आता ती कामावर पुन्हा परतली आहे. याची माहिती स्वतः ताहिराने ट्विट करुन दिली.

तिने लिहिले, ‘काम सुरु..प्रिप्रोडक्शन, हॅपी थँक्सगिविंग. आभारी आहे.’ यासोबतच तिने एक फोटोही शेअर केला. ज्यात ती गाडीमध्ये बसली आहे. ताहिराच्या या पोस्टवर आयुष्मानने रिट्विट करत अभिमान असल्याचे म्हटले आहे. आयुष्मान एका कार्यक्रमात म्हणाला होता, की ‘मी खूप आनंदी आहे की मला ताहिरासारखा जोडीदार मिळाला. ती हुशार आहे, मजबूत आहे. ती माझी प्रेरणा आहे. तिच्यामुळे मी वेगळ्या नजरेने जगाला पाहणे सुरू केले आहे.’