उपखेड येथे भावांमध्ये हाणामारी; तीन जण जखमी

0

चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथे राजधर शामराव पाटील (73) यांचे घराचे बांधकाम चालू आहे. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी त्यांचा भाऊ अशोक शामराव पाटील व गोपाळ अशोक पाटील तसेच अरुण शामराव पाटील तिघे जण त्या ठिकाणी गेलेत आरोपी अशोक पाटील याने राजधर पाटील यांना सांगितले कि या जागेवर घर बांधू नको असे बोलल्याचे कारणावरून त्यांचेत बाचाबाची झाली त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपी अशोक शामराव पाटील याने त्याच्या हातातील कुर्हाड राजधर पाटील यांच्या डोक्यात मारून दुखापत केली व गोपाळ अशोक पाटील, अरुण शामराव पाटील यांनी त्यांचा मुलगा व सून यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली यात तिघे जण जखमी झाले असून तिघांवर मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत या प्रकरणी आरोपी अशोक शामराव पाटील, गोपाळ अशोक पाटील, अरुण शामराव पाटील तिघे रा उपखेड ता चाळीसगाव यांचे विरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.