उन्हाच्या कडाक्याने प्रेक्षक त्रस्त

0

पुणे : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेस पुणे येथील गहुंजेच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर पहिला कसोटी सामन्याने सुरवात झाली. त्या वेळी पुणे कसोटी केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. पुणे हे देशातील २५ वे आणि जगातील ११२ वे कसोटी केंद्र ठरले.  मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या गहुंजे गावात एप्रिल २०१२ मध्ये हे स्टेडियम उभे राहिले. मैदानाची क्षमता ३७ हजार इतकी आहे. आयपीएल, वन-डे क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने येथे झाले असले तरी, कसोटी सामना या मैदानावर प्रथमच खेळवला जात आहे. दरम्यान नुकताच थंडीचा मोसम संपून पुण्यात तीव्र उन्हाळा जाणवायला लागला आहे. याची झळ आज सुरु झालेल्या सामन्यातही लागली. याचा खेळाडूंसह प्रेक्षकांना त्रास सहन करावा लागला. यावेळी प्रेक्षकांनी डोक्यावर कार्टून्स घेत उन्हापासून वाचण्याचे प्रयत्न केले.