उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजप आमदाराला जन्मठेप !

0

नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरला न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी दोषी ठरवले होते. दरम्यान आज शुक्रवारी त्याला शिक्षा देण्यात आली आहे. निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. यावेळी न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे.

Copy