उद्या पुन्हा मोदींचा देशवासियांशी संवाद; मोठ्या घोषणेची शक्यता

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी जेंव्हा जेंव्हा देशवासियांशी संवाद साधतात तेंव्हा तेंव्हा ते नवीन काही तरी मोठी घोषणा करतात. त्यामुळे ते संवाद साधणार म्हणल्ययावर उत्सुकता लागून राहते. काहींना तर धडकीच भरते. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीदेशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. उद्या 14 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसासाठी केलेल्या लॉकडाऊनची समाप्ती होणार आहे. तत्पूर्वी उद्या सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशवासियांशी संवाद साधणार आहे. यावेळी ते पुन्हा लॉकडाउन वाढविण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रासह काही राज्यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा करतील असे बोलले जात आहे.

Copy