उद्या कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा

0

भोपाळ: ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. सोबतच २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सरकार मोठ्या संकटात सापडले. कालच माजी मुख्यमंत्री भाजप नेते शिवराज सिंह चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान राज्यपालांनी तातडीने उद्याच १६ रोजी कमलनाथ सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहे. उद्या कमलनाथ सरकारची मोठी अग्निपरीक्षा होणार आहे. त्यात कमलनाथ सरकार टिकणार की, कोसळणार हे उद्याच स्पष्ट होतील. शिवराजसिंह चव्हाण यांच्यासह भाजप नेत्यांनी काल राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली.

कमलनाथ सरकार कोसळल्यास भाजपचे सरकार येणार यात शंका नाही, मात्र उद्याच हे स्पष्ट होईल.

Copy