उद्धव ठाकरे शब्द न पाळणारे मुख्यमंत्री: विनायक मेटेंचा आरोप

0

मुंबई: मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. आरक्षण टिकवून ठेवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. आरक्षण स्थगितीच्या विरोधात राज्यभरतील मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात आंदोलन होत आहे. दरम्यान यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शब्द न पाळणारे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेने नेहमीच मराठा आरक्षणाला विरोध केला असल्याचा घणाघाती आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.

मराठा आरक्षण टिकण्यासाठी सरकारची बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडल्याचे उघड झाले आहे. महाविकास आघाडीची मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची इच्छा नसल्याचे दिसून येते असे आरोपही त्यांनी केला आहे.