उद्धव ठाकरे आणि शिवसेना उमेदवाराच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या !

0

उस्मानाबाद: उस्मानाबाद मतदार संघाचे शिवसेनेचे लोकसभा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दिलीप ढवळे असे शेतकऱ्याचे नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळे येथील हा शेतकरी आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने चिठ्ठी लिहिली आहे. यात ही बाब उघड झाली आहे. शेतातल्या झाडाला गळफास लावून घेत त्यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये ढवळे यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला आहे. चार एकर जमिनीचे ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक या दोघांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे हाल झाले आहे. या परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली.

दिलीप ढवळे यांचा मृतदेह झाडावरून खाली उतरवण्यात आल्यानंतर पोलिसांना त्यांच्या खिशात ढोकी पोलीस निरीक्षकाच्या नावे लिहिलेली चिठ्ठी आणि मतदारांना आवाहन करणारे पत्र सापडले आहे. ढवळे यांनी सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या दोघांनी जी फसवणूक केली त्याचमुळे आत्महत्येची वेळ आल्याचे ढवळे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

या दोघांनी चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पाडले. आपल्या नावे घेतलेल्या कर्जाची सर्व रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देवूनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीनवेळा लिलाव पुकारला गेला. त्यातून गावात मानहानी झाली आहे. सततचा दुष्काळ आणि यांनी केलेली फसवणूक यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे.

Copy