Private Advt

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ वरणगावात घोषणाबाजी

वरणगाव : शिवसैनिकांनी गुरुवारी सकाळी शिवसेना संपर्क कार्यालयात सर्व शिवसैनिक जमा झाले व त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटीत गेलेले ‘सर्व आमदार’ आणि ‘एकनाथ शिंदे परत’ या अशी आर्त हाकदेखील येथील शिवसैनिकांनी केली आहे.

वरणगावात कार्यकर्त्यांचा जयघोष
वरणगावात शिवसेना संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या आदेशाने वरणगाव शहरातील शिवसैनिक एकत्र येऊन हिंदू हृदयसम्राट सरसेनासपती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवजी, उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, आवाज कुणाचा शिवसेनेचा विविध घोषणांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी परीसर शिवसेनेच्या घोषणांनी दणाणून गेला.

यांची होती उपस्थिती
यावेळी भुसाळ उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, वरणगाव शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, उपशहर प्रमुख अशोक शर्मा, सुखदेव धनगर, राम शेटे, मुस्लिम समाजाचे सय्यद जाफर अली उर्फ हिप्पी शेठ, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक सईद मुल्लाजी, तालुका संघटक मोहसीन खान, माजी उपशहर प्रमुख सुनील भोई, शिवा भाई, संजीव कोळी, ज्येष्ठ शिवसैनिक नितीन देशमुख, यशवंत बढे, उमाकांत झांबरे, सुरेश चौधरी, शहर संघटक पंकज चौधरी, पंकज पाटील, अतुल पाटील, राहुल वंजारी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विलास वंजारी, सुनील देवघाटोळे, दीपक शेळके, वैभव लोखंडे, रोहित मुळे, किरण माळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.