मंत्रालयात उदयनराजेंच्या भाजप मंत्र्यांशी भेटीने चर्चेला ऊत

0
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मंत्री परिषदेच्या दिवशी मुंबईत मंत्रालयात येऊन भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या. उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उदयनराजे लोकसभेची जागा भाजपच्या तिकीटावर लढविणार आहेत. ते भाजपमध्ये दाखल होणार आहेत, अशा देखील उलटसुलट चर्चा यामुळे मंत्रालयात सुरु होत्या.
दुसरीकडे मतदारसंघातील कामांबाबत उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असे सांगण्यात आले. उदयनराजे यांनी सुरुवातीला मराठा आरक्षणाबाबतही  मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर राज्यातील इतर काही प्रश्नांवर ते बोलले असल्याचे समजते. उदयनराजे यांनी पंकजा मुंडे यांचीही भेट घेतली. त्यात त्यांनी अनेक इतर प्रश्न आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा केली. आपल्या मतदारसंघातील काही कामांबाबत त्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येते. पुन्हा उदयनराजे यांनी आपला मोर्चा गिरीश महाजन यांच्याकडे वळविला. दरम्यान उलटसुलट चर्चा काहीही येत असल्या तरी साताऱ्यात त्यांची राष्ट्रावादी कॉंग्रेसकडून लोकसभेचे तिकीट फिक्स झाले असल्याचे राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
Copy