Private Advt

उत्तर महाराष्ट्रात प्रहार पक्षाला क्रमांक एकचा पक्ष बनवणार : अनिल चौधरी

भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरींचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश

भुसावळ : भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी सोमवारी दुपारी निवडक कार्यकर्त्यांसह राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. कुरळपूर्णा आश्रमशाळा ता.चांदूरबाजार, जि.अमरावती येथे आमदार बच्चू यांच्या निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा झाला. अनिल चौधरी यांना प्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी आमदार बच्चू कडू यांनी जवाबदारी देत शुभेच्छा दिल्या. यावेळी यावलचे माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी, यावलचे नगरसेवक अभिमन्यू चौधरी, भुसावळ संजय आवटे, पातोंडीचे गणेश बोरसे, सामाजिक कार्यकर्ते अमोल देशमुख, जयहिंद बँकेचे संचालक मनोज करणकाळ, भुसावळचे नगरसेविका पती संजय आवटे, शब्बीर शाह, युनूस खान तसेच रावेर यावलसह जळगाव जिल्ह्यातील आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रवेश प्रहार जनशक्ती पक्षात प्रसंगी प्रवेश केला.

उत्तर महाराष्ट्रात प्रहार पक्ष वाढवणार : अनिल चौधरी
माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले की, सोमवारी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला असून प्रहार जनशक्ती पक्षाला उत्तर महाराष्ट्रात आता नंबर एकचा पक्ष बनवणार आहे शिवाय आगामी काळात भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत आमचा पक्ष ताकदीनिशी रींगणात उतरणार असून आमच्याच पक्षाचा नगराध्यक्ष पालिकेत असेल व आमच्याच पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.