Private Advt

उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा योगीराज : बहुमत भाजपालाच

उत्तर प्रदेश मध्ये आता पुन्हा योगीराज येणार याबाबत केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाला तब्बल २३० जागांवर आघाडी मिळाली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर उत्तर प्रदेशातील नागरिकांनी पुन्हा विश्वास ठेवला असून उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा योगीच मुख्यमंत्री होणार हे आता निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशातला जनतेने योगिना यावेळेस भरभरून मतदान केलं आहे हेच या निकालावरून दिसत आहे.