उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

0

देहूरोड : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या जानेवारी 2019 मध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते देहूरोड दरम्यान रस्ता रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. गेल्यावर्षी पासून सुरू असलेले ही कामे दोन ठेकेदारांना देण्यात आली आहेत. त्यातील उड्डाणपुलाचे काम टी.अ‍ॅेण्ड टी. कंपनीतर्फे करण्यात येत आहे. उड्डाणपुलाची लांबी सहाशे मीटर आहे. या पुलाच्या कामासाठी राज्य शासनातर्फे 34 कोटी रुपये देण्यात आले आहेत. सध्या या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून या पुलावर डांबरीकरण सुरू आहे. त्याचबरोबर पुलावर दिशादर्शक फलक लावणे, सुरक्षा फलक लावणे, पथदिव्यांचे कामही हाती घेण्यात आले आहे. येत्या डिसेंबरअखेर ही सर्व कामे पूर्ण होणार असून जानेवारी 2019 मध्ये हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

Copy