‘उडान’ समिती पथकाने केली विमानतळाची पाहणी

0

जळगाव । जळगाव विमानतळावरुन स्थानिक उड्डाणांची सुविधा सुरु करण्यासंदर्भात आवश्यक त्या पूर्ततांची तपासणी करण्यासाठी स्थानिय संपर्क अभियान अर्थात उडान अभियानाअंतर्गत संयुक्त समितीने आज जळगाव येथील विमानतळाची पाहणी केली. आज सकाळी जळगाव विमानतळ येथे या समितीचे आगमन झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी जलज शर्मा हे जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपस्थित होते.

या समितीत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे सह महाव्यवस्थापकआर.पी. हजारे, नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचे एम.टी.बोकाडे, भारतीय हवामान विभाग, मुंबईचे सुनिल कांबळे, तेल बिया संशोधन केंद्र जळगाव येथील हवामान तज्ज्ञ एच.एस. महाजन,जळगाव मनपाचे अभियंता डी. आर. थोरात, प्रकाश पाटील, पोलीस उपअधिक्षक (गृह) एम. बी. पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, एम.आय.डी.सी. पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे, नायब तहसिलदार डी.जी.भालेराव, जळगाव विमानतळावरील भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी प्रकाश चंद्र, शहाबुद्दीन मुलतानी, घनश्याम सिंग, योगेश शेंडे, बसवंत राव आदी उपस्थित होते.