उटखेड्याच्या शेतकर्‍याच्या शेतातून केळीचे कंद लांबवले : एकास अटक

0

रावेर : तालुक्यातील उटखेडा येथील शेतकर्‍याच्या शेतातून केळीचे कंद अज्ञात चोरट्याने लांबवले. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. शेतकरी पुरूषोत्तम भागवत पाटील (65, रा. उटखेडा, ता.रावेर) यांनी त्यांच्या शेतात लावण्यासाठी केळी पीकाचे 600 कंद बांधावर ठेवले होते. गावातील संशयीत आरोपी टोपलु बळीराम तायडे (65, रा.उटखेडा, ता.रावेर) याने हे कंद चोरून नेल्याचा आरोप शेतकरी पाटील यांनी चोरलेल्या कंदाची विचारणा केली असता संशयीत आरोपीने शिवीगाळ करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिल्याने शेतकरी पुरूषोत्तम पाटील यांनी रावेर पोलिसात धाव घेत आपबीती कथन केल्याने आरोपी टोपलु तायडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर संशयीत आरोपीस अटक करून त्याच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक मनोज वाघमारे व हवालदार जितेंद्र पाटील यांनी ही कारवाई केली.

Copy