उच्छल भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

0

नवापूर: शहरातील सीमेवर कोरोना दस्तक देत असुन उच्छल भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील नवापूर रेल्वे स्टेशन परिसरातील ९ लोकांना कोरेंनटाईन करण्यात आले असुन नवापूर शहरात बाहेर गावाहुन आलेल्या लोकांचा शोध घेऊन तपासणी करण्यात येत आहे.

उच्छल येथील २७ वर्षीय महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे कळताच सीमावर्ती भागातील उच्छल आणि नवापूर तालुका प्रशासनाची झोप उडाली आहे.
कोरोना बाधित महिलेच्या घरापासून ३०० मिटर अंतरावर नवापूर रेल्वे स्टेशन आणि वाकीपाडा गाव असल्याने नवापूर तालुका प्रशासन सायंकाळी ७ वाजेपासून सतर्क झाले होते. त्या महिलेच्या संपर्कातील रेल्वे स्टेशन परिसरातील ९ लोकांना कोरेंनटाईन सेंटर नवापूर येथील कला, वाणिज्य महाविद्यालय येथे आणल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली.
खबरदारी म्हणून वाकीपाडा गाव तीन दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. सम्पूर्ण वाकीपाडा गावात सरपंच ग्रामसेवक यांनी स्वतः जातीने लक्ष घालून गल्लीत घराच्या आजूबाजूचा परिसर सेनेटाइझ करण्यात येत असल्याची माहिती सरपंच व ग्रामसेवक यांनी दिली.

Copy