उंबरखेड महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर हल्ला; पैसे घेऊन चोरटे पसार

0

चाळीसगाव- उंबरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक अभिजीत काळकर व सहकारी रोखपाल स्वप्नील देवकर हे नियमित बँकेत ड्युटीवर जात असताना सकाळी १०.३० च्या सुमारास सोबतची पैशाच्या बॅग लुटीच्या उद्देशाने चार-पाच जणांनी मालेगाव रस्त्यावरील आडगावजवळ चॉपरने मारहाण करत बॅग घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत दोन्ही जखमी झाले आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अभिजित काळकर हे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. बँक रोखपाल स्वप्नील देवकर हे देखील नेहमी प्रमाणे त्यांचे सोबत होते. ते नियमित ड्युटीवर जायला निघाले असता त्यांना लुटण्यात आले.

रुग्णालयात भाजप कार्यकर्त्यांनी धाव घेतली. भाजप तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, बाजार समितीचे सभापती रविंद्र पाटील, संचालक सरदार राजपूत, रावी संचालक विश्वासराव चव्हाण युवा मोर्चाचे कपिल पाटील, अनुसूचित आघाडीचे सुबोध वाघमारे, राजेंद्र पाटील-उंबरखेडकर, सहायक पोलीस निरीक्षक एन.वाय.शेख, बँक ऑफ महाराष्ट्राचे किशोर जाधव, किशोर कोतकर यांच्यासह अधिकारी तसेच नायब तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी धाव घेतली. जखमी बँक व्यवस्थापक अभिजीत काळकर यांची प्रकृती स्थिर असली तरी जबर हल्ल्यामुळे मानसिक धक्का बसला आहे.