उंटावद येथील नागरीकाचा गुजरात राज्यात अपघाती मृत्यू

यावल : तालुक्यातील उंटावद येथील रहिवासी नागरीकाचा गुजरात राज्यात अपघाती मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. चंद्रशेखर मधुकर पाटील उर्फ नाना असे मृताचे नाव आहे. ते बडोदा येथे नोकरीनिमित्त स्थायीक होते. दाभोई जिल्ह्यात त्यांच्या दुचाकीला झालेल्या अपघातात ते ठार झाले. सोबत असलेला त्यांचा पुतण्या किरकोळ जखमी झाला.

उंटावद गावात शोककळा
उंटावद येथील मधुकर भास्कर पाटील यांचा मुलगा चंद्रशेखर उर्फ नाना मधुकर पाटील (वय 46) हे नोकरीनिमित्त बडोदा (गुजरात) येथे स्थायिक होते. ते रविवारी सकाळी बडोदा येथून दुचाकीद्वारे राजपिपला जवळील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळा पाहण्याकरिता जात होते. सकाळी 9.30 वाजता ते दाभोई येथे पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरून बाहेर निघत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात ते जागीच ठार झाले तर त्यांच्या सोबत असलेला त्यांचा पुतण्या कुणाल पाटील यास किरकोळ दुखापत झाली.