ईश्वराच्या नामचिंतनाने जीवन प्रकाशमय बनवा

0

जळगाव : श्रद्धेच्या शक्तीमुळे व्यक्ती निर्भय बनते. माणसाने कर्म करायला हवे. कधीही जीवनात हताश होऊ नका.पूजनाने एक प्रकारची उर्जाच मिळते, आणि त्या माध्यमातून आपल्याला जीवनात सफलता मिळत असते. व्यक्तीचे मन सरळ आणि चांगले असायला हवे.म्हणजेच सरळमार्गी जीवन जगले पाहिजे यामुळे मनाला शांती मिळते.असे विचार कथासम्राज्ञी साध्वीदेवकन्या सुगनाबाईसा (दीदी) यांनीश्रीमद् देवी भागवत संगीतमय कथेतनिरुपणाद्वारे मांडले.

सागर पार्क येथे देवी भागवत कथा सुरु आहे. आज कथेचासातवा दिवस होता. कथाकार दीदी सुगनादेवीसा प्रवचनात पुढे म्हणाल्या आपले जीवनच ईश्वराची देण आहे, मग भीती कशाला बाळगायची?सात्विक जीवन जगण्यातच धन्यता माना असे सांगून, कुठल्याच प्रकारचे व्यसन करू नका, व्यसनामुळे आपल्यामध्ये दुर्गुणांची निर्मिती होते. असेही त्यांनी सांगितले. सोरटी सेवा समितीचे अध्यक्ष व जळगावचे आमदार राजूमामा भोळे,स्वागताध्यक्ष महापौर नितीन लढ्ढा तर कार्याध्यक्ष राजू बांगर हे आहेत.

सचिव राजेश यावलकर, रामदयाल सोनी आहेत. सातव्या दिवशी दैनिक यजमान म्हणून रामदयाल सोनी होते. तर प्रसाद यजमान म्हणून भागजी सोनी हे होते.कालच्या लग्नाच्या उत्सवाचे यजमान म्हणून श्रीनिवास व्यास होते. सायंकाळची आरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रोहिणीताई खडसे (खेवलकर), बँकेचे उपाध्यक्ष आ. किशोर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते झाली.