ईश्वरचिठ्ठीला बागलकरांचे न्यायालयात आव्हान

0

मुंबई । गिरगाव चंदनवाडी वॉर्ड क्रमांक 220 मध्ये सेना-भाजपाच्या उमेदवारामध्ये लढत होती. या लढतीत सेनेकडून सुरेंद्र बागलकर व भाजपाचे अतुल शहा यांना समसमान मते पडल्याने टाय झाला. टाय झाल्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांनी ईश्वरचिठीने विजेता घोषित केला.शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर यांचा ईश्वरचिठ्ठीने पराभव झाला . याच निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यार आहे.

निवडणूक अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार
गिरगाव चंदनवाडी वॉर्ड क्रमांक 220 मध्ये शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर आणि भाजपा उमेदवार अतुल शहा यांना दोघांना प्रत्येकी 5946 मते मिळाली. मतांमध्ये टाय झाल्याने निवडणूक अधिका-यांनी ईश्वरचिठ्ठीने विजेता निवडण्याचा निर्णय घेतला. ईश्वरचिठ्ठीने भाजपा उमेदवार अतुल शहा यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक अधिका-यांच्या निर्णयाविरोधात शिवसेना उमेदवार सुरेंद्र बागलकर यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 तर, भाजपाला 82 जागा मिळाल्या. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी अपक्षांना महत्व आले असून, प्रत्येक जागा दोन्ही पक्षांसाठी महत्वाची आहे. शिवसेनेला 3 अपक्षांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ 87 झाले आहे. अशा परिस्थितीत वॉर्ड क्रमांक 220 संबंधी न्यायालयाचा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे.