ईव्हीएम तपासणीला मुक्ताईनगर तालुक्यापासून सुरुवात

0

लोकसभा निवडणुकीत तयारी : 30 दिवसांमध्ये 11 हजार ईव्हीएमची होणार तपासणी

भुसावळ- लोकसभा निवडणुकीसाठी येथील तहसीलमधील शासकीय गोदामात ठेवलेल्या मतदान यंत्रांच्या फर्स्ट लेव्हल युनिट चेकिंगच्या कामाला बुधवारी मुक्ताईनगर तालुक्यापासून सुरुवात झाली. या कामासाठी प्रत्येक तालुक्याला दोन दिवसांचा कालावधी मिळाला असून 30 दिवसांत 11 हजार मशिनची तपासणी होईल. बुधवारी मतदान यंत्रे तपासणीसाठी बंगळुरू येथील अभियंत्यांनी मार्गदर्शन केले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लागणारे ईव्हीएम भुसावळात ठेवले आहेत. बंगळुरू येथून येथून दोन टप्यात ही यंत्रे भुसावळात आली होती. ही सर्व यंत्रे नवीन असल्याने त्यांची बटने नीट आहे का? कंट्रोल युनिट, बॅलेट युनीटची तपासणी सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला दोन दिवस दिले जातील. या दोन दिवसात तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने मतदार संघात लागणारे इव्हीएमची तपासणी करून घ्यावयाची आहे. बुधवारी मुक्ताईनगर तालुक्यापासून या तपासणीला सुरुवात झाली. निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांचे पथक तपासणी कक्षात हजर होते. काही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची देखील उपस्थिती होती. या सर्वांना बंगळुरू येथून आलेल्या अभियंत्यांनी इव्हीएम हाताळणीबाबत माहिती दिली. आपण ज्या उमेदवाराला मतदान केले, ते बरोबर झाले किंवा नाही? ही माहिती देणारे व्हीव्ही पॅट, कंट्रोल व बॅलेट युनिट आणि मतदान यंत्रांची फर्स्ट लेव्हल युनिट तपासणी झाली. तलाठी, टेक्निकल हायस्कूलमधील शिक्षक आणि महसूल कर्मचारी अशा 60 जणांच्या ताफ्याने ही तपासणी केली.

Copy