ईद-ए-मिलाद उत्साहात 

0
जळगाव- ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीने आज सोमवारी मध्यवर्ती जळगाव शहर दणाणुन गेले  होते. मिरवणुकीनतंर  ‘या अल्लाह जगात शांतता नांदू दे, देशात एकात्मता नांदू दे , देश महासत्ता होवू दे’ अशी प्रार्थना करत मुस्लिम समाज बांधवांतर्फे अल्लाहला साकडे घालण्यात आले. सुन्नी जामा मस्जिद व अहेले सुन्नत वल जमा अत शहरे जलगावतर्फे दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले  होते.
मुस्लिम समाज बांधवांचा सर्वात पवित्र सण ईद-ए-मिलादुन्नबी सोमवारी शहरात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी साडेनऊ वाजता भिलपूरा येथील इमाम रजा अहमद चौक येथून मौलाना जाबीर रजा रजवी यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात झाली. तानतंहर  घाणेकर चौक, सुभाष चौक, आठवडे बाजार, नेरी नाका, एस.टी. वर्क शॉपमार्गे मुस्लिम कब्रस्थान येथे समारोप करण्यात आला. ठिकठिकाणी  शोभायात्रेचे स्वागत करण्यात येवून फराळाचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीत सहभागी बांधवांकडून घोषणा देण्यात येत होत्या. तसेच ध्वनी प्रक्षेपकावरुन नातपाक व सलाते सलामचे पठण करण्यात येत  होते.  मिरवणुकीत 10 हजारावर बांधव उपस्थित
होते. मिरवणुकीत खासदार इश्वरलाल जैन यांनी देखील सहभाग घेवून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्यात.
 सुभाष चौकात पोलिस  डिवायएसपी सचिन सांगळे , शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, शनिपेठचे निरिक्षक आत्माराम प्रधान यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले. सुभाष चौकात पंरपरेप्रमाणे अजाण देण्यात आली. समरोप प्रसंगी प्रस्ताविक आयोजक सैय्यद  अयाज अली  यांनी केले. मौलाना अब्दुल रहीम कादरी यानी नात पठण केले.मौलाना वसिम रजा यांनी इदचे महत्व सांगीतले. यशस्वितेसाठी नियाज अली, मौलाना जाबीर रजा, मौलाना वासेफ रजा, मौलाना नजमुल, शेख कासीम, शेख रईस, फिरोज शेख, उमर साजिद शेख, सिकंदर रजवी, मुख्तार हाजी यांनी सहकार्य केले. यासह पंधरा हजार हून अधिक सुन्नी मुस्लीम बांधव उपस्थित होते.
मिरवणूक फळ वाटप 
ईद-ए- मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत सुन्नी बांधवांतर्फे मिरवणूकीतील सहभागी मुस्लीम बांधवांना, तसेच लहान मुलांना सरबत, पोहे, खजूर पाणी, केळी आदी फळ व खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, मोहम्मद पैंगबर यांच्या जयंती निमित्त तांबापूरात मुस्लीम बांधवातर्फे जल्लोषाद मिरवणूक काढण्यात आली. उंटावर ध्वजाधारी युवकासह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव तसेच लहान मुलांनी मिरवणूकीत सहभाग घेतला होता.
रुग्णांना अन्नदान 
मोहमंद पैगंबरच्या मानवतेचा संदेश निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना अन्नदान वाटप केले. काकर समाजाचे अध्यक्ष रियाज काकर, उपाध्यक्ष मोहसीन काकर, शिरपुरचे मौलाना अक्रम, धुळे येथील नबी काकर, रफिक काकर यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. तसेच ईद-ए-मिलाद निमित्त टस्टतर्फे जिल्हा रुग्णालय, रेल्वे स्टेशन, बस स्थानकातील गरिबांना वाढत्या थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी चादर वाटप केले. फळांचे वाटप करण्यात आले. अध्यक्ष ऐनोद्दीन शेख, सिद्दीक मन्यार, रहिमोद्दीन शेख आदी उपस्थित होते.
*मन्सुरी पिंजारी बिरादरी 
ईद-ए- मिलाद निमित्त जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व बालसुधार गृहमध्ये फळ वाटप करण्यात आले. रुग्णालय व बालसुधार गृहात 500 जणांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, रेडक्रॉस चेअरमन गनी मेमन, पिंजारी बिरादरीचे अध्यक्ष गनी शेख अहमद पिंजारी, युवा बॉडीचे अध्यक्ष अफजल पिंजारी आदी उपस्थित होते.