ईद ए मिलादुन्नबीनिमित्त चाळीसगावात भव्य मिरवणूक

0

चाळीसगाव- प्रेषित हजरत मोहंमद पैंगबर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. हुडको,जहागीरदार नगर,बाराभाई मोहल्ला,तेराभाई मोहल्ला,न.पा.मंगल कार्यालय,नागद रोड,ईस्लामपुरा आदि सर्वच भागातुन मशिदींचे मौलाना व त्यांचे सोबत युवक,आबालवृद्ध मोठ्या प्रमाणात घाटरोड येथील जामा मशिदीजवळ सकाळी 10 वाजता एकत्र जमले. यावेळी प्रत्येक भागातील युवकांनी सजविलेल्या वाहनातुन हजरत मौहंमद पैंगबर यांच्या स्मरणार्थ व सन्मानार्थ घोषणा व गीतगायन करत परिसर दणाणुन सोडला होता,मिरवणुकीत ठीकठिकाणी मिठाई,शरबत व पाण्याचे वाटप करण्यात आले,घाट रोड जामा मशिद येथुन मिरवणुक छाजेड आइल मिल,सदानंद हाटेल,डा.बाबासाहेब आंबेडकर चौक,शिवाजी घाट,बहाळ दरवाजा,सदर बाजार,रांजणगाव दरवाजा मार्गे पीर मुसा कादरी बाबा दर्गाहवर विसर्जित करण्यात आली,यावेळी मा.आमदार राजिव देशमुख,नगरसेवक आण्णासाहेब कोळी,नगरसेवक घृष्णेश्वर पाटील,नगरसेवक शेखर देशमुख,पत्रकार आर.डी.चौधरी,अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव,डी.वाय.एस.पी.नजीर शेख,पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद ए मिलाद निमित्त शुभेच्छा दिल्या,चाळीसगाव शहर पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरिक्षक आशिष रोही,पी.एस.आय.युवराज रबडे,वाहतुक विभागाचे पी.एस.आय.राजेश घोळवे,पो.हे.का.ज्ञानेश्वर घुले,गणेश पाटील,बापुराव भोसले,पंढरीनाथ पवार,मयुरी पाटील यांनी व महिला पुरुष आर.सी.पी.प्लाटून ने चोख बंदोबस्त ठेवला.यावेळी गफुर पहेलवान,अलाऊद्दीन शेख,ईकबाल कूरेशी,फकिरा मिर्झा,रफीक शेख,मुराद पटेल,अजिज खाटीक,असलम मिर्झा,रियाज शेख,हुसनोद्दीन सैय्यद,रफिक मनियार,अनिस मिर्झा,मंजुर खान,अहेमद खान,तनवीर शेख,नविद शेख व मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते,सर्व हिंदु मुस्लिम बांधवांनी विश्वशांती साठी दर्गाहावर प्रार्थना केली. मिरवणूक छाजेड आईल मिल जवळुन गेल्यानंतर रस्त्यावर साचलेला कचरा ड्रायव्हर मित्र मंडळींनी स्वच्छता करुन एक अनोखा संदेश दिला.

Copy