ईगतपुरी टिटोली यार्डातील कामांसाठी चार दिवसांचा ब्लॉक

मनमाड-मुंबई, जनशताब्दी गाड्या रद्द : ईगतपुरीत थांबणार गाड्या

भुसावळ : ईगतपुरी टिटोली यार्डातील कामांसाठी यार्डात 27 ते 31 मे असा चार दिवसापर्यंत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम सुरू करण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. जन शताब्दी एक्स्प्रेस व मनमाड-मुंबई या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहे तर काही गाड्या या ईगतपुरी रेल्वे स्थानकावर चार तासापेक्षाही जास्त वेळ उभ्या केल्या जाणार आहे.
02102 व 02101 मनमाड-मुंबई-मनमाड ही गाडी शनिवार, 28 मे ते 2 जून पर्यत असे सहा दिवस रद्द करण्यात आली तर 28 मे या दिवशी डाऊन मार्गावरील गाड्यांचे रेग्यूलेशन करण्यात आले आहे.

या गाड्या होणार रेग्युलेट
11059 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा एक्सप्रेस, 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्सप्रेस तर अप मार्गावरील गाड्यांचे रेग्यूलेशन करण्यात येत आहे. यात 12072 जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, 12142 पाटलीपुत्र-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, गोरखपूर-पनवेल एक्सप्रेस, गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाड्या आज, 27 मे रोजी रेग्यूलेट करण्यात येतील.

नियोजित वेळेपेक्षा विलंबाने सुटणार्‍या गाड्या
नियोजित वेळेपेक्षा विलंबाने गाड्या सोडण्यात येणार आहे. यात शनिवार, 28 मे या दिवशी 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र एक्सप्रेस सुटणारी गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रविवार, 29 मे रोजी सकाळी 4.30 वाजता सुटेल. 15066 पनवेल – गोरखपूर एक्सप्रेस 28 मे या दिवशी सुटणारी गाडी त्याच दिवशी सायंकाळी 6. 30 वाजता पनवेल येथून सुटेल. 31 मे या दिवशी टिटोली यार्ड येथे सकाळी 5.15 ते 11.15 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.

या गाड्या 31 रोजी रद्द
12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस व 12072 जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस या दोन गाड्या 31 मेला रद्द केल्या आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

31 मेला डाऊन मार्गाच्या गाड्यांचे रि-शेड्युलिंग
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 10.55 वाजता सुटणारी 11059 छपरा एक्सप्रेस दुपारी 12.15 वाजता सुटेल, 82356 मुंबई- पाटणा एक्सप्रेस सकाळी 11.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी एकला सुटेल, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 11.30 वाजता सुटणारी जयनगर एक्स्प्रेस 12.30 वाजता सुटेल, पनवेल येथून दुपारी 3.50 वाजता सुटणारी गोरखपूर एक्सप्रेस रात्री 8.30 वाजता सुटेल. दि. 31 मेला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 11.35 वाजता सुटणारी पाटलीपुत्र एक्स्प्रेस 1 जूनला सकाळी 4.30 वाजता सुटणार आहे.

डाऊन मार्गावरील रेग्यूलेशन केलेल्या गाड्या
कामाख्या एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई- जबलपूर गरीबरथ एक्सप्रेस, मुंबई- वाराणसी एक्सप्रेस या गाड्या दि. 31 मे या दिवशी रेग्यूलेशन करण्यात आल्या आहे. तर मंगला एक्स्प्रेस सुध्दा सोमवार (दि. 30 मे) रेग्यूलेशन करण्यात आली आहे.

या गाड्या थांबतील ईगतपुरीला
ब्लॉकच्या काळात 31 मे या दिवशी ईगतपुरी रेल्वे स्थानकावर 90 मिनिटांपासून 270 मिनिटांपर्यंत (दिड तास ते साडेचार तास) थांबणार आहे. यामुळे या गाड्या वेळेपेक्षा इच्छीत स्थानकांवर उशिराने पोहोचतील. यात 30 मे या दिवशी पाटलीपूत्र लोकमान्य टिळक टर्मिनस, गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस, छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस, गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस तर रविवार, 29 मे या दिवशी गुवाहाटी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसही गाडी थांबणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून या कामामुळे प्रवाशांच्या होणार्‍या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करीत सहकार्याचे आवाहन केले आहे.