इसिस मोजतेय शेवटची घटका

0

नवी दिल्ली : जगातील सर्वात क्रुर अतिरेकी संघटना म्हणून ओळखल्या जाणार्‍या इसिसचा (आयएसआयए) प्रमुख अबु बकर अल बगदादीने आपला पराभव मान्य केला आहे. त्याने आपल्या शेवटच्या निरोपाच्या भाषणात म्हटले आहे की, अरब देशांबाहेरून आलेल्या आयएसआयएसच्या सदस्यांनी आपआपल्या देशात परत जावे किंवा स्वताला बॉम्बने उडवून घ्यावे. बगदादीने मोसुला येथील आपले कार्यालयही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बगदादीच्या आदेशामुळे जगातील विविध देशातून इसिसमध्ये भरती झालेले अतिरेकी तरूणसुध्दा हवालदिल झाले आहेत.

इराकी टीव्ही चॅनल अलसुमरियाच्या वृत्तानुसार, स्वयंघोषीत खलीफा बगदादीने आयएसआएसच्या मौलवींच्या बैठकीत निरोपाचे भाषण केले. या भाषणात त्याने ही माहिती दिली. अरब देशांच्या बाहेरून आलेल्या तरूणांना जन्नतमध्ये 72 हुर मिळण्याचे अश्‍वासन देत त्याने आपआपल्या देशात परतण्याचे आदेश दिले. किंवा स्वताला बॉम्बने उडवून घ्या, असाही सल्ला दिला आहे.

बगदादीला मृत्यू दिसू लागला
संपुर्ण जगात दहशत माजविणारा, हजारो लोकांचे गळे चिरून त्याचे व्हीडीओ व्हायरल करून भीती पसरवणारा बगदादी आता स्वताचा मृत्यू दिसू लागल्याने प्रचंड घाबरला आहे. तसेच अस्वस्थ झाला आहे. मोसुलमध्ये लाखो सैनिकांनी घेरल्याने त्याचे सध्या हातपाय कापत आहेत. इराकच्या मोसुल शहरात बगदादीने मागील दोन वर्षापासून आपली राजधानी स्थापन केली होती.

मोसुलमध्ये लपला आहे कु्ररकर्मा
इराकी सैन्याने प्रथम मोसुलच्या आजुबाजूच्या गावांना आयएसआयएसच्या दहशतवादी कारवायांपासून मुक्त केले. आता मोसुलला बगदादीपासून मुक्त करण्याची वेळ अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. बगदादीविरूध्द इराकी सैन्यासह अन्य सैनिकही शेवटची लढाई लढत आहेत. बगदादी आता मोसुलमध्ये लपून बसला आहे. त्याच्या हालचाली मर्यादित झाल्यासून त्या केवळ मोसुल आणि त्याच्या जवळच्या अफर शहरापर्यंत मर्यादित आहेत.

अतिरेक्यांच्या चेहर्‍यावर मृत्यूचे भय
छोट्या-छोट्या गोष्टींवरून निष्पाप लोकांचे शिर उडविणारे, त्यांना सुळावर चढवणारे, गोळ्या घालणारे आणि जीवंत जाळणारे अतिरेकी आता स्वताचा मृत्यू समोर दिसू लागल्याने भयभीत झाले आहेत, त्यांच्या डोळ्यात पाणी दिसू लागले आहे. इराकी सैन्याने पकडल्यानंतर तर काही अतिरेकी प्रचंड घाबरलेले दिसत आहेत.

बगदादीचे काऊंट-डाऊन सुरू
अबु बकर अल बगदादीच्या मृत्यूचे काऊंट-डाऊन सुरू झाले आहे. बगदादीला ठार मारण्याच्या आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने घोषणा केली आहे की, 30 दिवसांच्या आत ते बगदादी आणि त्याची पिलावळ मुळासह उखडून टाकतील. ट्रम्प यांनी बगदादीला ठार मारण्याचे आदेश नॅशनल सिक्युरीटी टीमला दिल्याचे वृत्त आहे.