Private Advt

इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात देण्याच्या नावाखाली तरुणाला 14 लाखांचा गंडा

जळगाव : टीव्ही, फ्रीज आदींसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होलसेल दरात स्वस्तात देण्याच्या नावाखाली शहरातील तरुणाची तब्बल 14 लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सायबर पोलिसात गुन्हा
शेख मोहंमद वासीम मोहंमद हारून (39, रा.इकबाल कॉलनी, जळगाव) यांचे मेहरूणमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्तीचे दुकान आहे. गतवर्षी फेसबुकवर एसी टेक्नीशीयन हा ग्रुप जॉईन केला. या ग्रुपचा अ‍ॅडमीन सैयद वासीम अब्दुल याच्याशी त्याने संपर्क साधला. यातून झालेल्या ओळखीतून सैयद वासीम अब्दुल याने आपल्याकडे अत्यंत स्वस्त किंमतीत इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू मिळत असल्याचे सांगितले. त्याने आपल्या वस्तूंचा कॅटलॉग देखील पाठविला. सैयद वसीम अब्दुल शेख मोहंमद वासीम मोहंमद हारून याने 100 एसी, 100 टिव्ही आणि 100 फ्रिज यांची ऑर्डर दिली. यासाठी त्याने तब्बल 14 लाख 39 हजार 458 रूपये समोरच्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये जमा केले मात्र बरेच दिवस होवूनदेखील त्याला वस्तू मिळाल्या नाहीत. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याचे सायबर पोलिस स्थानकात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.